भारतीय समाजाला धार्मिक असहिष्णुता, अवैज्ञानिक विचारपद्धती आणि संकुचित मानसिकता यावर मात करावी लागेल
जमातवाद हे कुठल्याही एका समुदायाचे लक्षण नव्हे. लहान-मोठे सारेच धार्मिक समुदाय या प्रवृत्तीला बळी पडत आले आहेत. भारतीय संदर्भात जमातवादाचे स्वरूप समजून घेण्यासाठी या उपखंडातील दोन सर्वांत मोठ्या धार्मिक समुदायांच्या - हिंदू आणि मुस्लिमांच्या - परस्परसंबंधांचा अभ्यास करणे हा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. हिंदू आणि मुसलमान सारेच किंवा त्यांच्यातले बहुसंख्य लोक हे स्वभावत:च जमातवादी आहेत, असा याचा अर्थ नाही.......